Advertisement

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, भाजपाला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा सुरू झाली होती.

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील
SHARES

भाजपाच्या (bjp) महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेशाध्यक्षपदी (President) चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंगल प्रभात लोढा (mangal prabhat lodha) यांनाही पुन्हा भाजपाच्या मुंबई (mumbai) अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहेभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नियुक्तींची घोषणा केली आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, भाजपाला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बानवकुळे आदी नेते होते. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुन्हा चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली आहे. चंद्रकांत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात.


मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा 
(mangal prabhat lodha) यांना कायम ठेवण्यात आलं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी केल्यानं  आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा दिला जावा, अशी अपेक्षा भाजपात व्यक्त होत होती. शिवसेनेला जशास तसं उत्तर देणाऱ्या आशिष शेलार यांना अध्यक्षपद देण्याची चर्चा होती. मात्र,  आमदार लोढा यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. हेही वाचा - 

मनसेच्या नव्या झेंड्यावरून वाद, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा