ईडी अधिकाऱ्यांवरील ओरोपांची मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी

ईडीचे काही अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. ईडीचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र नवलानी हे मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवतात. त्यांनी १०० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली आहे. याचे पुरावेदेखील आपल्याकडे असून ते महाराष्ट्र पोलिस व केंद्र सरकारला देणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं होतं.

तसंच, ईडीच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भाजप नेत्यांशीही संबंध आहे. किरीट सोमय्या यांचा नवलानीशी काय संबंध आहे हे त्यांनीच सांगावं, असं राऊत म्हणाले होते. यासंदर्भात राऊत यांनी दिलेल्या पुराव्यांची दखल घेत मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून आता या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितलं.


हेही वाचा

एमआयएम भाजपची बी टीम तर, मनसेला सी टीमचे काम मिळाले : आदित्य ठाकरे

‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ - सुजात आंबेडकर

पुढील बातमी
इतर बातम्या