Advertisement

एमआयएम भाजपची बी टीम तर, मनसेला सी टीमचे काम मिळाले : आदित्य ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एमआयएम भाजपची बी टीम तर, मनसेला सी टीमचे काम मिळाले : आदित्य ठाकरे
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका करताना मनसेला भाजपची सी टीम म्हणून काम मिळाल्याचं म्हटलं आहे.

“आधी मी मनसेला टाईमपास टोळी म्हणत होतो. पण आता त्यांना भाजपचं काम मिळालं आहे,” अशी जहरी टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मागे लागली आहे. केवळ निवडणुकीची निकाल पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची टूम काढली, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली होती.

मनसे ही भाजपची सी टीम आहे. या आधी मी त्यांना टाईमपास टोळी म्हणत होतो. मात्र आता त्यांना काम मिळाल्यानं मी खूश आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, त्यानंतर आता मनसेला भाजपच्या सी टीमचे काम मिळालं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना २०१९च्या निवडणुकाच्या वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती आणि निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा साक्षात्कार झाला होता. यानंतर ज्याच्या विरोधात लढले त्यांनाच सोबत घेत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसच होतील, असं सांगितलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.



हेही वाचा

‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ - सुजात आंबेडकर

तर मशिदीच्या समोर दुप्पट भोंगे लावून हनुमान चालिसा, राज ठाकरेंचं अल्टीमेटम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा