Advertisement

‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ - सुजात आंबेडकर

मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतलाय.

‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ - सुजात आंबेडकर
SHARES

मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Amit Thackeray) यांनी खरपूस समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे.

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं. मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले, तर मी तिथे हनुमान चालीसा म्हणायला लावेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर सुजात यांनी निशाणा साधत राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले सुजात?

सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना आव्हान देत वक्तव्य करताना म्हटलंय, की…

“माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा, फक्त…”

सुजात आंबेडकर म्हणाले, “सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा.

“हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं”

“मला तिकडे एकही बहुजन पोरगा नको आहे. जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं, मग हनुमान चालिसा म्हणा,” असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

गुढीपाडव्या दिनी आयोजित सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.”



हेही वाचा

तर मशिदीच्या समोर दुप्पट भोंगे लावून हनुमान चालिसा, राज ठाकरेंचं अल्टीमेटम

मेट्रोवरून शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई, मुंबईत बॅनरबाजी जोरात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा