Advertisement

मेट्रोवरून शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई, मुंबईत बॅनरबाजी जोरात

मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची चर्चा सुरू आहे.

मेट्रोवरून शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई, मुंबईत बॅनरबाजी जोरात
SHARES

मेट्रो मार्गांच्या (Mumbai Metro) उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची चर्चा सुरू आहे.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमालाच निमंत्रण नाही. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं नसलं तरीही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मात्र कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण होत असताना आता या कामाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. वांद्रे परिसरात यासंदर्भातील बॅनर्स लावण्यात आले आहेत.

मुंबईच्या वांद्रे परिसरात भाजपच्यावतीनं लावलेल्या या बॅनरवर लिहलंय की, मेट्रो प्रकल्पासाठी लाखो कोटींचा निधी केंद्र सरकारनंच दिलाय याची आठवण करून देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.

मुंबईत गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मात्र त्या आधी श्रेयवादाची गुढी उभारली आहे. भाजपच्या वतीने आज मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' असं लिहिण्यात आलं आहे.

भाजप सेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. यातच आज वांद्रे इथं लागलेले फडणवीसांचे बॅनर यावरून श्रेयवाद रंगला आहे.



हेही वाचा

गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेचा टीझर प्रदर्शित

मुंबई मेट्रो २A आणि ७ची स्थानकं, भाडे, वेळापत्रक जाणून घ्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा