Advertisement

गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेचा टीझर प्रदर्शित

गुढी पाढव्याच्या भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे.

गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेचा टीझर प्रदर्शित
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुर्तावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

गुढी पाढव्याच्या भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातला राज ठाकरेंचा बाईट लावण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात, आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर २ एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला, असा आवाज त्याला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा आवाजही देण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी गेल्या भाषणावेळी भाजप पासून ते शिवसेनेच्या संजय राऊतांपर्यंत सर्वांचा समाचार घेतला होता. एवढच काय राज ठाकरेंनी पुण्यातल्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही सोडलं नव्हतं. त्यामुळे आता गुढी पाडव्याच्या भाषणात मेन टार्गेट कोण अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र करोनामुळे दोन वर्षांत हा मेळावा होऊ शकला नव्हता. त्यातच अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता या गुढीपाडवा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



हेही वाचा

"...म्हणून महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारच", भाजपा आक्रमक

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार? मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा