Advertisement

"...म्हणून महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारच", भाजपा आक्रमक

केवळ हिंदू सणांना का विरोध केला जातो, असा प्रश्नही प्रसाद लाड यांनी उपस्थित केला.

"...म्हणून महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारच", भाजपा आक्रमक
SHARES

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसहीत महाराष्ट्रभरातील अजान बंद झाले पाहिजेत अशी पक्षाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे.

जुन्या काळामध्ये वेळ कळण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. पण आज सगळ्यांकडे घड्याळं, मोबाईल आहेत त्यामुळे आता अजानची गरज नाही अशी भूमिका लाड यांनी मांडली आहे.

तसंच आम्ही हे अजान बंद करून राहणारच असं सांगताना केवळ हिंदू सणांना का विरोध केला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

“दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा विरोध आहे. आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाहीय. पण धर्माच्या माध्यमातून ज्यापद्धतीनं धर्म बळकावण्याचा काम करतायत त्याला आमचा विरोध आहे. पूर्वीच्या काळी अजान याच्यासाठी वापरला जायचा की पाच वेळा नमाज पडत असताना वेळ कळावी. लोकांनी झोपेतून उठावं नमाझ पठण करावं यासाठी अजानचा आधार घेतला जायचा,” असं लाड यांनी अजानसंदर्भात बोलताना म्हटलं.

ते पुढे म्हणाले की, “त्या काळात लोकांकडे घड्याळं नव्हती. आज घड्याळं आहेत, मोबाईल फोन्स आहेत. भिंतीवर घड्याळं आहेत. त्यामुळे आज त्या अजानची गरज नाहीय,” असं लाड म्हणाले.

“महाराष्ट्रात दिवाळीला विरोध, गणपतीला विरोध, होळीला विरोध, गुडीपाडव्याच्या मिरवणुकीला विरोध, रामनवमीला विरोध मग अजानला विरोध का नाही? त्यामुळे या मुंबईतील, महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि हे आम्ही बंद करून राहणार,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार? मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये १ एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथिल होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा