Advertisement

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार? मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरीची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे.

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार? मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र
SHARES

नाणार तेलशुद्धीकरण (Refinery project) प्रकल्पासाठी आता पर्ययी जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला दिल्याचं बोललं जात आहे. अध्याप यासंदर्भात अद्याप कुठली अधिकृत माहिती समोर आली नाही.

पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिफायनरी संदर्भात पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार रिफायनरीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच रिफायनरीसाठी नव्या जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोधात आहे. यामुळे नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा समावेश आहे.

बारसू रिफायनरीसाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास २४१४ एक जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच होणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

१३ हजार एकर जमीन राजापूर तालुक्यातील बारसू साठी दिली जाऊ शकते. तसंच नाटे इथली २ हजार एकर समुद्र किनाऱ्याची जमीन बंदर उभारणीसाठी दिली जाऊ शकते, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे राज्याच्या जीडीपी ८.५ टक्क्यांनी वाढणार आहे. महाराष्ट्र सरकारने रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं.

नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. पण स्थानिकांना नको आहे, त्यांचा विरोध आहे. यामुळे प्रकल्प नेताना स्थानिकांना विश्वासात घेऊ. भूमिपुत्रांचे सोबत चर्चा करून त्यांचे हक्क अबाधित राहतील, याची काळजी सरकार घेईल. त्यांना विश्वासत घेऊनच आम्ही पुढे जाऊ, असं कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केलं होतं.



हेही वाचा

महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये १ एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथिल होणार

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा