Advertisement

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

सध्या आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी हा अपघात झाला.

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
SHARES

कोकण दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन गाडीची टक्कर झाली आणि किरकोळ अपघात झाला. यामध्ये गाडीचं नुकसान झाले आहे. कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असेल. बुधवारी आदित्य ठाकरे मालवण इथल्या रॅलीला संबोधित करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यानं शिवसेना कोकणातील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी (Nanar Refinery) प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना नाणार प्रकल्पासंदर्भात मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्यांची सकारात्मक भूमिका दिसून आली आहे. प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेऊ, असं सांगितलं.



हेही वाचा

नारायण राणेंना मुंबई महापालिकेकडून दिलासा

लॉकडाउनमध्ये दाखल सर्व गुन्हे ठाकरे सरकार मागे घेणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा