Advertisement

लॉकडाउनमध्ये दाखल सर्व गुन्हे ठाकरे सरकार मागे घेणार

नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाउनमध्ये दाखल सर्व गुन्हे ठाकरे सरकार मागे घेणार
SHARES

लॉकडाउन काळात नियमांचं उल्लंघन केल्यानं गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागानं या विद्यार्थी तसंच नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी ANIला या संदर्भात माहिती दिली की, “कोविडच्या काळात ज्या नागरिंक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल”.



हेही वाचा

‘द काश्मिर फाईल्स' राज्यात करमुक्त नाहीच - आदित्य ठाकरे

"आमदारांना घरे मोफत नाहीत, तर..." : जितेंद्र आव्हाड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा