Advertisement

"आमदारांना घरे मोफत नाहीत, तर..." : जितेंद्र आव्हाड

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

"आमदारांना घरे मोफत नाहीत, तर..." : जितेंद्र आव्हाड
SHARES

मुंबईमध्ये ग्रामीण भागातील आमदारांना घरे देण्याच्या घोषणेवर अनेकांनी टीका केली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली आहे.

आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयला मनसेकडूनही विरोध केला जात आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

आमदारांना मोफत घरे कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

तर मुंबईत सर्वपक्षीय आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी ३०० घरं देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही टीका केली आहे.

"सरकार डळमळीत असल्यानं आमिष म्हणून आमदारांना घरं द्यायची आहे का? सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील ग्रामीण भागांमधून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरं बांधण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, जे शहरातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्राच्या बाहेरील आहेत, असे आमदार राज्य सरकारच्या या योजनेचे पात्र लाभार्थी असतील, असं आव्हाड यांनी सांगितलं.



हेही वाचा

आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या घोषणेला मनसेचा विरोध

ग्रामीण भागातील आमदारांना सरकार मुंबईत ३०० फ्लॅट देणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा