Advertisement

आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या घोषणेला मनसेचा विरोध

राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याच्या सरकारच्या घोषणेला मनसेचा विरोध आहे.

आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या घोषणेला मनसेचा विरोध
SHARES

राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली. मनसे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

आमदारांना मोफत घरे कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

तर मुंबईत सर्वपक्षीय आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी ३०० घरं देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही टीका केली आहे.

"सरकार डळमळीत असल्यानं आमिष म्हणून आमदारांना घरं द्यायची आहे का? सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील ग्रामीण भागांमधून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरं बांधण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, जे शहरातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्राच्या बाहेरील आहेत, असे आमदार राज्य सरकारच्या या योजनेचे पात्र लाभार्थी असतील, असं आव्हाड यांनी सांगितलं.

औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी बुधवारी, २३ मार्च रोजी विधानसभेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की, त्यांच्यासारख्या ज्या आमदारांचे मुंबईत निवासस्थान नाही त्यांना मदत करण्यात यावी. त्याला उत्तर देताना थोरात यांनी अशा उपक्रमासाठी आपला विभाग सहकार्य करेल, असे उत्तर दिले.



हेही वाचा

ग्रामीण भागातील आमदारांना सरकार मुंबईत ३०० फ्लॅट देणार

बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्यांची नावं देणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा