Advertisement

बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्यांची नावं देणार

अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम २९३ अन्वये चर्चा करण्यात आली.

बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्यांची नावं देणार
SHARES

वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव इथल्या बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

तसंच गोरेगाव इथल्या पुर्नविकास होत असलेल्या पत्रा चाळीला यापुढे सिद्धार्थनगर नावानं ओळखलं जाईल असंही आव्हाड यांनी जाहीर केलं.

मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा इथं पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरू होईल अशी घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुंबईतील ५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी आणि बीडीडी चाळीचा पुर्नविकास या आणि अशा अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम २९३ अन्वये चर्चा करण्यात आली.

परळमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील १०० खोल्या कॅन्सरचे उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईंकासाठी दिल्या आहेत. तसंच मुंबईतील जिजामातानगर इथं विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. 19 मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे.

ताडदेव येथे ३२ कोटी खर्च करून ९२८ महिला राहू शकतील अशी इमारत बांधण्यात येत आहे. तसंच पालघर इथं २० एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटल शेजारी असलेल्या भूखंडावर जागतिक दर्जाचे वेटरनरी (पशूवैद्यकीय) हॉस्पिटल बांधण्यात येईल. जोगेश्वरी पश्चिम येथे म्हाडाच्या भूखंडावर मुंबईकरांसाठी एक जागतिक दर्जाचे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे.



हेही वाचा

उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारचा पुढाकार

बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांसाठी नाममात्र मुद्रांक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा