Advertisement

ग्रामीण भागातील आमदारांना सरकार मुंबईत ३०० फ्लॅट देणार

गृहनिर्माण विकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ही घोषणा केली आहे.

ग्रामीण भागातील आमदारांना सरकार मुंबईत ३०० फ्लॅट देणार
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्र सरकार लवकरच मुंबईतील गोरेगावमध्ये ग्रामीण भागातील आमदारांसाठी ३०० फ्लॅट उपलब्ध करून देणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण विकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, आव्हाड यांनी विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, ज्या आमदारांचे मुंबईत वास्तव्य नाही, शहरातील कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व नाही आणि मुंबई महानगर प्रदेशाबाहेरून आलेल्या आमदारांना याचा लाभ घेता येईल.

ग्रामीण भागातील किती आमदार मुंबईत येतात आणि आज ते कोणत्या पक्षाचे आहेत यानं काही फरक पडत नाही. परंतु महाराष्ट्र सरकार त्यांची जबाबदारी घेते, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ही गृहनिर्माण योजना गोरेगावमध्ये बांधणार आहे जी उच्च उत्पन्न गट श्रेणीतील सदनिका असेल.

औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी बुधवारी, २३ मार्च रोजी विधानसभेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की, त्यांच्यासारख्या ज्या आमदारांचे मुंबईत निवासस्थान नाही त्यांना मदत करण्यात यावी. त्याला उत्तर देताना थोरात यांनी अशा उपक्रमासाठी आपला विभाग सहकार्य करेल, असे उत्तर दिले.हेही वाचा

बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्यांची नावं देणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा