Advertisement

‘द काश्मिर फाईल्स' राज्यात करमुक्त नाहीच - आदित्य ठाकरे

'द काश्मीर फाईल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘द काश्मिर फाईल्स' राज्यात करमुक्त नाहीच - आदित्य ठाकरे
SHARES

‘द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट राज्यात करमुक्त केला जाणार नसल्याची माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 'द काश्मीर फाईल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, असे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही, कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहणार आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि ते तो वापरत आहेत, असे आमचे मत आहे.

द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशभरात उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपनं केली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराविषयी सांगण्यात आले आहे. आता या चित्रपटासाठी एका दूध विक्रेत्यानं अनोखा पुढाकार घेतला आहे.

घाटकोपरच्या नायडू कॉलनी इथं असलेल्या दूधसागर डेअरीचे मालक अनिल शर्मा यांनी आपल्या ग्राहकांना 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाची तिकिटे दाखवून दुधावर सवलत मिळू शकेल, अशी ऑफर दिली आहे.



हेही वाचा

ईडीचा प्रताप सरनाईकांना दणका! ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या घोषणेला मनसेचा विरोध

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा