Advertisement

ईडीचा प्रताप सरनाईकांना दणका! ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

ईडीनं NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे.

ईडीचा प्रताप सरनाईकांना दणका! ११.३५ कोटींची संपत्ती जप्त
SHARES

ईडीनं NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. ईडिनं त्यांची ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, २५ डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे.

आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे.

PMLA अंतर्गत करण्यात आलेल्या तपासात आढळून आलं आहे की, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे NSEL च्या कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले होते.

ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची २४२.६६ कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन २०१२-१३ कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे २१.७४ कोटी वळते केले. त्यापैकी ११.३५ कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली.



हेही वाचा

आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या घोषणेला मनसेचा विरोध

"आमदारांना घरे मोफत नाहीत, तर..." : जितेंद्र आव्हाड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा