लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर जाहीर होणारा मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मोदींकडून सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न होईल अशी आशा होती. त्यानुसार आयकराची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्याप्रमाणे अखेर शुक्रवारी संसदेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला आणि पियुष गोयल यांच्या ज्या घोषणेकडे करोडो सर्वसामान्यांचे डोळे लागले होते ती घोषणा अखेर पियुष गोयल यांनी केली. अडीच लाखांची आयकरांची मर्यादा ५ लाखांपर्यंत नेत मोदींनी मध्यमवर्गांयांना मोठं गिफ्ट देत खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वसामान्य नोकरदारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणांचा पाऊसही यावेळी सरकारकडून करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांची पहिली मोठी अपेक्षा असते ती आयकराची मर्यादा वाढवण्याची. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आयकराच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांकडून अडीच लाखांची आयकराची मर्यादा ५ लाखांपर्यंत न्यावी अशी मागणी होती. तर शिवसेनेकडून ही मर्यादा ८ लाखांपर्यंत करण्याची मागणी होती. त्यामुळे शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारकडून आयकराच्या मर्यादेत बदल होतो का याकडेच नोकदारांचं लक्ष लागलं होतं आणि अपेक्षेप्रमाणं सरकारनं नोकरदारांना खुश केलं. आयकराची मर्यादा अडीच लाखांवरून ५ लाख करत सरकारनं नोकरदारांना खुश केलं आहे. यावर सरकार थांबलेलं नाही तर पीएफ वा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास साडेसहा लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर कोणाताही कर लागणार नाही. या घोषणेचा फायदा ३ कोटी करदात्यांना होणार आहे.
एकूण रक्कम | आयकराची मर्यादा |
५ लाखापर्यंत | ० टक्के |
५ लाख ते १० लाख | २० टक्के |
१० लाखांच्या पुढे | ३० टक्के |
त्याचवेळी ४० हजारापर्यंतचे कर्ज व्याजमुक्त केलं आहे. स्टॅण्डर्ड डिडक्शन रेट या आधी ४० हजार रुपये होता तो आता थेट ५० हजार रुपये असा गेला आहे. एकीकडे नोकरदारांना खुश करतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांना मोदी सरकारनं जाता जाता खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या चार वर्षात मोदी सरकारवर सर्वात नाराज कोण होतं तर ते म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांचा रोष गेल्या चार वर्षांत प्रकर्षानं दिसून आला. त्यामुळेच मोदी सरकारकडून शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी योजनांचा पाऊस पाडला आहे.
ट्रायच्या नवी नियमावली लागू, ग्राहक मात्र अजूनही संभ्रमात
अर्रर्रर्र! वाॅटरटॅक्सीची प्रतिक्षा लांबली, तांत्रिक अडचणींचा फटका