अजोय मेहता यांची नार्कोटेस्ट करा: मनसेची मागणी

कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत रेस्टाॅरंट, हाॅटेल्सवर कारवाई करताना ही कारवाई थांबवण्यासाठी मला राजकीय व्यक्तीचा फोन आला होता, असा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केल्यानंतर महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे ही दबाव टाकणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षातील होती की विरोधी पक्षातील हे आयुक्तांनी ताबडतोब जाहीर करावं, नाहीतर त्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

पारदर्शकतेच्या गोष्टी

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या करत कमला मिल कंपाऊंड आगीच्या दुर्घटनेप्रकरणी भूमिका मांडली. कमला मिल कम्पाऊंडमधल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणणारी व्यक्ती महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा नेता आहे की विरोधी पक्षातला 'भैया' आहे ? हे किमान या आयुक्तांनी सांगावं. आयुक्त नेहमीच पारदर्शक कारभाराच्या गोष्टी करत असतात. मग त्या व्यक्तीचं नाव का सांगत नाही?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

नाहीतर, नार्कोटेस्ट

त्यामुळे आयुक्तांनी दबाव टाकणाऱ्याचं नाव जाहीर करावं, नाहीतर खरं खोटं नेमकं काय आहे हे बाहेर येण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा-

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!


पुढील बातमी
इतर बातम्या