शिवसेना, भाजपा पाकिस्तानी साखर घरोघरी वाटणार का?- विखे पाटील

पाकिस्तानहून साखर आयात केल्याने देशातील साखर उत्पादक शेतकरी मेटाकुटीला येतील. केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी साखरेवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लावण्याची मागणी करण्यात आली होती. तरीही सरकारने ही साखर आयात केलीच. देशात साखरेचं पुरेसं उत्पादन झालेलं असताना आता ही पाकिस्तानी साखर भाजपा-शिवसेनेचं सरकार घरोघरी वाटणार आहेत का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला.

देशातली साखर पडून

गेल्यावर्षीही साखरेचं चांगलं उत्पन्न झाल्याने ही साखरं अजूनही पडून आहे. त्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेच आणखी दीड पट जास्त साखरेचं उत्पादन झालं आहे. परिणामी गळीत हंगामाला सुरूवात झाली तेव्हा साखरेचा दर ३१५० रूपयांवरून घसरून २५५० वर उतरला. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. बॅंकांनी उचल देणं बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्याची अनेक कारखान्यांची क्षमता राहिलेली नाही.

सरकारने काय करावं?

  • सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा, निर्यातीला अनुदान द्यावं
  • सरकारच्या नाकाखाली पाकिस्तानातून साखर कुणी आणली याचा खुलासा करावा
  • पाकिस्तानविरोधात नेहमीच भूमिका घेणारी शिवसेना-भाजपा ही साखर घरोघरी वाटणार का? हे सांगावं


हेही वाचा-

पाकिस्तानच्या साखरेवर राष्ट्रवादीची धाड

जाहिरातबाज मोदी सरकारची ४ हजार कोटींची उधळण


पुढील बातमी
इतर बातम्या