विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी अापल्या पदाचा राजीनामा दिला अाहे. विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपण्याअाधीच ठाकरे यांनी राजीनामा दिला अाहे.
नाराजीतून राजीनामा
काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार अाहे. कार्यकाळ संपण्यास ८ दिवस शिल्लक असतानाच त्यांनी राजीनामा दिला अाहे. काँग्रेसने पुन्हा विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने माणिकराव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात अाहे. विधान परिषदेवर जाण्यास ते उत्सुक होते. मात्र, पक्षाने त्यांना डावललं. तेव्हापासून ते नाराज होते. अापली नाराजी त्यांनी पक्षाकडे व्यक्तही केली असल्याचं सांगितलं जात अाहे. या नाराजीतूनच त्यांनी हा राजीनाम दिल्याची चर्चा अाहे.
हेही वाचा -
दूधकोंडीचा तिसरा दिवस, दूध एक्स्प्रेस रोखण्यासाठी शेट्टी डहाणूकडे रवाना
'भलत्या'च शब्दावरून विरोधकांकडून भाजपची कोंडी