Advertisement

'भलत्या'च शब्दावरून विरोधकांकडून भाजपची कोंडी


'भलत्या'च शब्दावरून विरोधकांकडून भाजपची कोंडी
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उंचीवरून मंगळवारी विधानसभेत गोंधळ सुरू होता. हा वाद सुरू असतानाच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या विषयासंदर्भात 'भलता'च शब्द वापरला नि यावरूनच एक वेगळाच वाद सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय भलताच वाटतो का? असं म्हणत विरोधकांनी भाजपाला चांगलचं कोंडीत पकडलं. विधानसभेचं कामकाजही रोखून धरलं.

इतकंच नव्हे, तर भातखळकर यांच्या निलंबनाच मागणीही विरोधकांनी लावून धरली. शेवटी भातखळकर यांनी माझे शब्द मागे घेतो असं म्हणत या वक्तव्याबद्दल माफी मागितली.


नेमकं काय झालं?

मुंबईत शिवाजी महाराजांचं अांतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गोंधळ सुरू असताना भातखळकर यांनी मूळ विषय पत्रिकेतील कामकाज बाजूला करत भलतेच विषय काढले जाताहेत, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले. शिवसेनेनंही भाजपाला कोंडीत पकडत भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी केली. काही वेळातच भलत्या या शब्दावरून वातावरण पेटलं नि विरोधकांनी अध्यक्षांच्या वेलमध्ये जाऊन ठिय्या मांडला. अध्यक्षांच्या टेबलावरील राजदंड पळवण्याचाही प्रयत्न विरोधकांनी केला.

या सर्व गोंधळानंतर भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल आपण भलताच शब्द वापरला होता असं स्पष्ट केलं. कुणाचा गैरसमज झाला तर शब्द मागे घेतो, असं म्हणत माफीही मागितली.


मेटे यांचा खुलासा

दरम्यान, अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली नसून आराखड्या नुसारच या पुतळ्याचं बांधकाम होणार आहे. पुतळ्याची उंची तलवारीच्या टोकापासून शिवाजी महाराजांच्या पायापर्यंत मोजण्यात येत असल्याचा खुलासा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.



हेही वाचा-

सरकारने पैशांसाठी शिवस्मारकाची उंची कमी केली- धनंजय मुंडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा