१७ व्या लोकसभा निवडणुकीतही मुंबईसह महाराष्ट्रात महायुतीचा भगवा फडकल्याचं दिसून येत आहे. मतमोजणीच्या फेऱ्या जसजशा आटोपत येत आहेत, तसं तसं निकालाचं चित्र अधिक स्पष्ट होत चाललं आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्रातही महायुतीच्या बाजूनैच जनतेने कौल दिला असून काँग्रेस राष्ट्रवादीचा पुरता बोऱ्या वाजला आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या अरविंद सावंत (४,२०,६७७) यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा (३,१९,९९७) यांचा १००,६८० मतांनी पराभव केला. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे (४,२४,९१३) यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२,७२,७७४) यांचा १,५२,१३९ मतांनी पराभव केला. उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्या पूनम महाजन (४,८१,५७२) यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त (३,३३,८०३) यांचा १,४७,७६९ मतांनी पराभव केला. उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे गजानन किर्तीकर (५,२७,९६०) यांनी काँग्रेसचे संजय निरूपम (२८५७७५) यांचा २,४२,१८५ मतांनी पराभव केला. उत्तर मुंबईत भाजपाचे गोपाळ शेट्टी (६,८८,३९५) यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर (२,३५,२०१) यांचा ४,५३,१९४ मतांनी पराभव केला. तर उत्तर पूर्व मुंबईत भाजपाचे मनोज कोटक (५,१४,५९९) यांनी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील (२,८८,११३) यांना २,२६,४८६ मतांनी पराभूत केलं.
हेही वाचा-
पुन्हा मोदी सरकार! २६ मे ला सत्तास्थापनेचा दावा
ही मोदींची लाट नाही तर सुनामी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस