Advertisement

पुन्हा मोदी सरकार! २६ मे ला सत्तास्थापनेचा दावा

देशात पुन्हा एकदा मोदी लाट उसळल्याचं चित्र दिसत असून या लाटेत काँग्रेससहित इतर विरोधकांचा अक्षरश: सुपडा साफ झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महाआघाडीने ३५० चा आकडा पार केला आहे.

पुन्हा मोदी सरकार! २६ मे ला सत्तास्थापनेचा दावा
SHARES

देशात पुन्हा एकदा मोदी लाट उसळल्याचं चित्र दिसत असून या लाटेत काँग्रेससहित इतर विरोधकांचा अक्षरश: सुपडा साफ झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महाआघाडीने ३५० चा आकडा पार केला आहे. तर काँग्रेसची १०० च्या आतच दमछाक झाली आहे..

सत्तास्थापनेचा दावा 

या महाविजयामुळे देशभरातील भाजपा कार्यालयांबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली. याउलट काँग्रेसच्या कार्यालयात मात्र सन्नाटा पसरला. भाजपाने २६ मे ला सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे..

काँग्रेसची दमछाक

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल जसजसे हाती येऊ लागले. तसंतसं देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट होऊ लागलं. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपाप्रणित एनडीएला ३५१ जागांवर आघाडी असून काँग्रेस महाआघाडीला केवळ ८५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर इतर जागांवर १०५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

मोदींनी हटवलं 'चौकीदार' 

विराट विजयानंतर मोदी यांनीआपल्या ट्विटर हँडलवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला आहे. याआधी 'चौकीदार चोर' या काँग्रेसच्या नाऱ्यांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या नावापुढे १७ मार्च रोजी 'चौकीदार' हाशब्द जोडला होता. त्यापाठोपाठ भाजपाच्या सर्वच नेत्यांनी आपल्या नावापुढे 'चौकीदार' हा शब्द लावला होता. 



हेही वाचा-

लोकसभेचे अंतिम निकाल इथं बघा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा