काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

निवडणुका जवळ आल्या की प्रचार होतोच. प्रचार निवडणुकीचा महत्त्वाचा गाभा. इतर पक्षांप्रमाणंच काँग्रेसनंही आता पूर्ण ताकदीनीशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काँग्रेसनं आता ४० स्टार प्रचारकांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि प्रियंका गांधी यांसारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.

रणनिती आखणार

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपने धूळ चारली होती. त्यावरून धडा घेत आता काँग्रेसनं नवी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या मोठ्या राज्यांसह अन्य राज्यांमधील दिग्गज नेत्यांनाही एकत्र घेऊन जनतेचं मन आपल्या बाजूनं वळवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या मागणीवरून आणि पक्षाची गरज पाहता काँग्रेसनं प्रियंका गांधी यांनाही रिंगणात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशबरोबरच प्रियंका गांधी यांच्या खांद्यावर महाराष्ट्राचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जोतिरादित्य सिंधीयांसारख्या युवा चेहऱ्यालाही प्रचाराच्या रिंगणात उतरवून युवकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रख्यात कवी इम्रान प्रतापगढी आणि अभिनय क्षेत्रातील काही चेहऱ्यांनही प्रचारासाठी उतरवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

संसदेत पाठवणार होतो पण...

राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी ३ लाख शाईच्या बाटल्या


पुढील बातमी
इतर बातम्या