Advertisement

राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी ३ लाख शाईच्या बाटल्या

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.

राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी ३ लाख शाईच्या बाटल्या
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांसह निवडणूक आयोगानं देखील निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शाई. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते.


३ लाख शाईच्या बाटल्या

यंदा लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदार संघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी निवडणूक आयोगानं ३ लाख शाईच्या बाटल्यांची मागणी केली होती. त्यानुसार, या सर्व बाटल्या राज्याला मिळाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी ही शाई म्हैसूर पेंट्स कंपनीमार्फत बनवण्यात आली आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये सुमारे ९५ हजार मतदानकेंद्र आहेत. या मतदान केंद्रावर शाईच्या बाटल्या आणि मतदानासाठी लागणारे इतर साहित्य पुढील आठवड्यात पोहोचविण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरू आहेत. 

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. तसंच, मतदानापूर्वी पोलिंग ऑफिसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही याची तपासणी करतात.



हेही वाचा -

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची हकालपट्टी; मिलिंद देवरा अध्यक्षपदी

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा