Exit polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं मतदान संपताच एक्झिट पोल्स (Exit polls)चे आकडे समोर आले. यातील बहुतांश आकडे भाजप-शिवसेनेला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवणारे असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीची निराशा करणारे आहेत.   

आव्हान निरर्थक?

गळतीने बेजार झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीआधीच शस्त्र मान्य केल्याने यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचं सरकार येणार असा दावा दोन्ही पक्षांतील नेते मोठ्या आत्मविश्वासाने करत होते. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने प्रचारांत मुसंडी मारत सत्ताधाऱ्यांपुढं आव्हान निर्माण केल्याचं म्हटलं जायला लागलं. परंतु एक्झिट पोलच्या आकड्यांनी मात्र या दोन्ही पक्षांना अत्यंत कमी जागवत या पक्षाची निराशा केली आहे.  

काय आहेत आकडे?  

'इंडिया टुडे- माय अॅक्सिस'च्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना महायुतीला १८१, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ८१ आणि इतरांना २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. 'सीएनएन न्यूज१८-आयपीएसओएस'च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला २४३, आघाडीला ४१ आणि इतरांना ४ जागा मिळतील. 'एबीपी-सीव्होटर'च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला २०४, आघाडीला ७५ आणि इतरांना १५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'टीव्ही-९ मराठी'च्या अंदाजानुसार महायुतीला १९७, आघाडीला ५४ आणि इतरांना १६ जागा मिळणार आहेत. 'जन की बात'ने च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला २२३, आघाडीला ५४ आणि इतरांना ११ जागा मिळणार आहेत. एकूण मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी पाहता महायुतीला २१३, आघाडीला ६१ आणि इतरांना १४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा-

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोप

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद? असं कोण म्हणालं- भूपेंद्र यादव


पुढील बातमी
इतर बातम्या