Advertisement

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद? असं कोण म्हणालं- भूपेंद्र यादव

भलेही शिवसेना आणि भाजपने एकत्रितरित्या मिळून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली असली, तरी भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कुठलाही शब्द दिलेला नाही असा खुलासा भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी केला आहे.

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद? असं कोण म्हणालं- भूपेंद्र यादव
SHARES

भलेही शिवसेना आणि भाजपने एकत्रितरित्या मिळून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक  लढवली असली, तरी भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कुठलाही शब्द दिलेला नाही असा खुलासा भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतील, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले यादव?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत युतीला २०० हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. गेल्या निवडणुकीत (२०१४)  शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. परंतु यंदा राज्याच्या हितासाठी हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले कारण विचारधारेसह आमच्या सर्व गोष्टी जुळतात. राहता राहिला प्रश्न शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा, तर त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस घेतील, असं यादव यांनी सांगितलं.   

पुन्हा हमरीतुमरी?

विधानसभा निवडणुकीआधी जागा वाटप तसंच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले होते. मतदान संपल्यानंतर जाहीर झालेले एक्झिट पोलचे आकडे शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने झुकणारे असल्याने दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा या पदावरून हमरीतुमरी होण्याची शक्यता आहे.  हेही वाचा-

तुम्हाला ‘इथं’ मिळेल १० रुपयांत जेवण, शिवसेनेची घोषणा प्रत्यक्षात

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोपसंबंधित विषय
Advertisement