Advertisement

तुम्हाला ‘इथं’ मिळेल १० रुपयांत जेवण, शिवसेनेची घोषणा प्रत्यक्षात

जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेने चक्क १० रुपयांत जेवण देण्यास सुरूवातही केली आहे. ‘साहेब खाना’ असं या योजनेचं नाव आहे.

तुम्हाला ‘इथं’ मिळेल १० रुपयांत जेवण, शिवसेनेची घोषणा प्रत्यक्षात
SHARES

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या १० रुपयांत सकस आहार देण्याची घोषणा नुकतीचं शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात केली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेली ही घोषणा प्रत्यक्षात उतरू शकेल का? यावरून तर्कवितर्क लढवले जात असताना जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेने चक्क १० रुपयांत जेवण देण्यास सुरूवातही केली आहे. ‘साहेब खाना’ असं या योजनेचं नाव आहे.

दसरा मेळाव्यातील घोषणा

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क इथं झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत सकस आहार देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यातही शिवसेनेने या घोषणेचा समावेश केला होता. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर शिवसेनेने जम्मूतील गरजू लोकांना १० रुपयांत जेवण देणाऱ्या ‘साहेब खाना’ योजनेचं उद्घाटन केलं आहे. या योजनेनुसार दररोज प्रत्येक व्यक्तीला ‘साहेब खाना’ थाळी अंतर्गत राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी असे पदार्थ दिले जात आहेत.

‘इथं’ सुरू आहे योजना

सध्या जम्मू येथील शिवसेना भवनात सुरू झालेली ही योजना जम्मूच्या राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल, जम्मू तवी रेल्वे स्टेशन, बक्षी नगर आणि शालिमार रुग्णालयातही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 



हेही वाचा-

शिवसेना देणार १० रुपयांत भरपेट जेवण, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून घोषणांची जंत्री

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा