Advertisement

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारसभेत राज ठाकरे शिवेसना-भाजप यांच्या युतीवर निशाणा साधत आहेत.

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारसभेत राज ठाकरे शिवेसना-भाजप यांच्या युतीवर निशाणा साधत आहेत. बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी 'भाजपा आणि शिवसेनेचे नेते राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत', अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात १० रुपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं. तर त्यानंतर भाजपानं ५ रुपयात अटल भोजन योजनेची घोषणा केली. या दोन मुद्द्यांवरुन राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर निशाणा साधला

सडलेली युती

'एक म्हणतोय १० रुपयात जेवण देईन एक म्हणतो ५ रुपयात जेवण देईन. महाराष्ट्राला काय भीक लागली आहे का? असा सवालही नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी केला. शिवसेना आणि भाजपा एकाही पक्षाला स्थानिक प्रश्नांशी काहीही घेणंदेणं नाही. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा अशी घोषणा केली होती. नाशिकमध्ये एक सीट दिली नाही ते चाललं १२४ वर यांची सडलेली युती अडली असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

भलत्याच गोष्टी

निवडणुकीच्या तोंडावर काय कामं केली ती बाजूला, ५ वर्षात काय केलं ते कोणीही सांगत नाही. भलत्याच गोष्टींवरती तुमचं लक्ष वळवायचं हेच प्रचारात सुरु असल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केलानाशिकमध्ये मनसेनं ५ वर्षात जी कामं केली ती सत्ताधाऱ्यांना २५ वर्षांमध्ये करता आलं नाही. माझा नाशिकमध्ये पराभव झाला मात्र माझे नाशिकवरचे प्रेम कमी झालं नाही असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महापालिकेवर आर्थिक बोजा

नाशिक शहराच्या विकासासाठी महापालिकेवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून मी सीएसआरमधून निधी आणला होता. शहर घडव असंही त्यांनी नमूद केलं.णं हे माझं पॅशन आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापना दिवसापासून बोलतो आहे ते स्वप्न माझं आजही आहे.


हेही वाचा -

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली 'ही' खुशखबर

JIO चा दणका, फूल टॉक टाइम बेनिफिट बंद


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा