राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली 'ही' खुशखबर

यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीनंतरच मिळणार होता. परिणामी दिवाळीचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत कर्मचारी होते.

SHARE

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आता दणक्यात साजरी होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीनंतरच मिळणार होता. परिणामी दिवाळीचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत कर्मचारी होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. सरकारने ९ ऑक्टोबरला एक परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पगार वितरण करणाऱ्या कोषागार विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने दिवाळीपूर्वी पगार देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलं होतं. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

नुकतीच निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव अयोज मेहता आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एक बैठक झाली. बैठकीनंतर कोषागार विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात आले. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार २५ ऑक्टोबरपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला. हेही वाचा -
संबंधित विषय
ताज्या बातम्या