SHARE

सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, अवर लेडी आॅफ ग्लोरी चर्च अशा ३ ऐतिहासिक व हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहीर झाला आहे. मेरिट या कॅटगरीत नेसेट एलियाहू सिनागॉग व आवर लेडी आॅफ ग्लोरी चर्च या वास्तूंना पुरस्कार जाहीर झाला असून, मान्यवरांच्या शिफारसीवरून फ्लोरा फाउंटननं हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

या पुरस्कारासाठी १४ देशांमधून ५७ वास्तूंची नोंदणी करण्यात आली होती, त्यातून या १६ वास्तू निवडण्यात आल्या आहेत. त्यानुसार, भारत, भूतान, आॅस्ट्रेलिया, चीन आणि न्यूझीलंडमधील १६ वास्तूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

अवर लेडी आॅफ ग्लोरी चर्च  - मुंबईतील भायखळा-माझगाव इथं हे चर्च असून, शहरातील सर्वात जुन्या रोमन कॅथलिक चर्चपैकी हे एक चर्च म्हणून ओळखलं जातं.  ही वास्तू १६३२ साली उभारण्यात आली होती.१९११ ते १३ या वर्षांत चर्चची गॉथिक शैलीत पुनर्बांधणी करण्यात आली.


फ्लोरा फाउंटन - ब्रिटिशकाळात १८६४ साली स्थापत्य आणि शिल्पकलेचा उत्तम  नमुना असलेल्य फ्लोरा फाउंटनची उभारणी करण्यात आली. कारंजे, रोमन देवता, भारतीय उद्योगधंदे, झाडे, फळे, धान्य यांच्या प्रतिकृतीसह युवतीचा पुतळा अशा प्रकारचे हे शिल्प आहे. सर हेन्री बेरटल आणि एडवर्ड फ्रेर यांच्या सन्मानार्थ ही वास्तू तयार करण्यात आली आहे.

नेसेट एलियाहू सिनागॉग फोर्ट येथील नेसेट एलियाहू सिनागॉग हे यहुदींचे प्रार्थनास्थळ आहे. १८८४ साली ही वास्तू उभारण्यात आली. या वास्तूचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले.



हेही वाचा -

दारूची आॅनलाईन खरेदी करणं पडलं महागात

बीएसएनएल व एमटीएनएल कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात



संबंधित विषय
ताज्या बातम्या