दारूची आॅनलाईन खरेदी करणं पडलं महागात

वाईन घरपोच करणाऱ्या दुकानांचा इंटरनेटवर शोध घेतला. त्याला अंधेरीतील एका वाईन शॉपचा दूरध्वनी क्रमांक आढळला. त्याने दूरध्वनी करून वाईन मागवली व "कॅश ऑन डिलिव्हरी' पर्याय निवडला.

दारूची आॅनलाईन खरेदी करणं पडलं महागात
SHARES
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलेले असताना भरारी पथकांच्या भितीने दारूच्या आॅनलाईन खरेदीने जोर धरला आहे. मात्र दारूची आॅनलाईन खरेदी करणं अंधेरीतील एकाला चांगलीच महागात पडली आहे.  दारू आॅनलाईन मागवताना पीन आणि ओटीपी शेअर केल्यामुळे चोरट्यांनी तक्रारदाराला सव्वा लाखांना चुना लावला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

निवडणुकीच्या काळात दारूच्या खरेदी - विक्रीवर भरारी पथकाचे बारीक लक्ष असते. त्यातच आता दारूची आॅनलाईन खरेदी व  घरपोच सुविधा वाईन शाॅप वाल्यांनी सुरू केल्यामुळे अनेकांचा त्रास वाचला खरा. मात्र हाच त्रास अनेकदा डोकेदुखीही ठरू लागला आहे. अंधेरीत राहणारा तक्रारदार एका मोबाइल सर्व्हिस स्टोअर्समध्ये अधिकारी  आहे. या व्यक्तीने वाईन घरपोच करणाऱ्या दुकानांचा इंटरनेटवर शोध घेतला. त्याला अंधेरीतील एका वाईन शॉपचा दूरध्वनी क्रमांक आढळला. त्याने दूरध्वनी करून वाईन मागवली व कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडला. परंतु, या पद्धतीने पैसे स्वीकारणे बंद केल्याचे त्याला सांगून क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी असा तपशील घेण्यात आला. यापूर्वीही तेथून वाईन मागवल्यामुळे शंका आली नाही, ओटीपी शेअर करताच तक्रारदाराच्याा मोबाइलवर पहिल्यांदा ३१ हजार ७७७ रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर पुन्हा ३१ हजार ७७७ रुपये आणि रात्री ११ च्या सुमारास ६१ हजार रुपये काढल्याचा मेसेज आल्याचे तक्रारदाराने सांगितले. 

या व्यवहारांबाबत संशय आल्यामुळे क्रेडिट कार्ड ब्लॉक करून बॅंकेकडे तक्रार नोंदवल्याची माहिती फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आणि तपास सुरू केला आहे. आपल्या वाईन शॉपच्या नावाचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार संबंधित व्यावसायिकाने केल्यावर पोलिसांनी दोन दूरध्वनी क्रमांकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा -
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा