Advertisement

आरेतून स्थालांतरीत केलेली अनेक झाडं मृतावस्थेत


आरेतून स्थालांतरीत केलेली अनेक झाडं मृतावस्थेत
SHARES

गोरेगावच्या आरे कॉलनीलीत मेट्रो प्रकल्पाच्या कारशेड झाडांची कत्तल करण्यात आली. या झाडांच्या कत्तलीवरुन सरकार आणि मेट्रो प्रशासनावर जोरदार टीका झाली. दरम्यान आरेमधील १८०० झाडांचं स्थलांतरित करण्यात आली असून, यामधील ८०० झाडं मृतावस्थेत आहेत.

झाडांचं स्थलांतर

मुंबईतील विविध ठिकाणांसह आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाडांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. यापैकी ८०० झाडं मृतावस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. झाडांचं स्थलांतर करताना आणि स्थलांतर पूर्ण झाल्यावर त्यांची योग्य काळजी घेण्यात येणार असल्याचं एमएमआरसीएलकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, योग्य ती काळजी न घेतल्याचं झाडांच्या अवस्थेवरुन दिसत आहे.

पानंही शिल्लक नाही

स्थलांतरित करण्यात आलेली काही झाडं सुकून गेली असून, काही झाडांच्या फांद्यांवर एकही पान शिल्लक राहिलेलं नाही. अनेक झाडं तर मृतावस्थेत आहेत. फक्त आरेच नव्हे, तर मुंबईतील इतरत्र भागांमध्ये स्थलांतरित केलेल्या झाडांची अवस्थादेखील अशीच आहे.



हेही वाचा -

राज ठाकरे नकलाकार, उद्धव हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार- रामदास आठवले

JIO चा दणका, फूल टॉक टाइम बेनिफिट बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा