Advertisement

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोप

'मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला' असा खळबळजनक आरोप 'बिग बॉस' फेम आणि विधानसभा निवडणुकीत वरळीतून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढलेले अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केला.

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोप
SHARES

'मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला' असा खळबळजनक आरोप 'बिग बॉस' फेम  आणि विधानसभा निवडणुकीत वरळीतून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढलेले अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केला. 

मी जिंकलो असतो...

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिचकुले म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळीतून ४ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम मला हरवण्यासाठी वापरण्यात आली होती. 'मी वरळीतून उमेदवारी अर्ज भरताच मला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच प्रतिसादामुळे मी लढत जिंकू शकलो असतो. त्यामुळेच मला पाडण्यासाठी पैसे वाटण्यात आले.’ 

 थाळी कशी देतात?

राजकारणातील नेते हेच सगळ्यात मोठे अभिनेते असतात. म्हणूनच ते लोकांना फसवू शकतात, गंडवागंडवी करू शकतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात १० रुपयांत सकस आहार देण्याचं आश्वासन दिलं आहे. ही थाळी ते कशी देतात? हे मला बघायचं असल्याचंही बिचकुले म्हणाले.हेही वाचा-

आदित्य ठाकरेंविरोधात लढणाऱ्या उमेदवाराची संपत्ती 'एवढी'!

तुम्हाला ‘इथं’ मिळेल १० रुपयांत जेवण, शिवसेनेची घोषणा प्रत्यक्षातसंबंधित विषय
Advertisement