Advertisement

आदित्य ठाकरेंविरोधात लढणाऱ्या उमेदवाराची संपत्ती 'एवढी'!

अभिजीत बिचुकले यांनी या प्रतिज्ञापत्रात केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात लढणाऱ्या उमेदवाराची संपत्ती 'एवढी'!
SHARES

बिग बॉस मराठी सीझन दोनमधील वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेले अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बिचुकले यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिजीत यांनी ४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, अर्ज दाखल करतेवेळी बिचुकले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. अभिजीत बिचुकले यांनी या प्रतिज्ञापत्रात केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

प्रतिज्ञापत्रात स्पष्ट

या प्रतिज्ञापत्रात अभिजीत बिचुकले यांनी दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही आपल्याकडं नसल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय, केवळ ७५ हजारांची रोख रक्कम असून, ३ बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, त्यांची पत्नी अलंकृता यांच्याकडं ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण ३ लाख २६ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. बिचुकले दांपत्याच्या नावावर एकही स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

आयकर नाही भरला

अभिजित बिचुकले यांनी मागील ५ वर्षांमध्ये एकदाही आयकर भरलेला नसून, त्यांची पत्नी अलंकृतानं २०१५-१६ मध्ये ४६ हजार ९९४ रुपयांचा आयकर भरला आहे. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ९० हजार रुपये, २०१७-१८ मध्ये ७५ हजार रुपये, २०१८-१९ मध्ये एक लाख ५ हजार ५९५ रुपये तर २०१९-२० मध्ये ६९ हजार ३६० रुपये आयकर अलंकृता यांनी भरला आहे. त्याचप्रमाणं साताऱ्यामध्ये आपल्याविरोधात एक खटला सुरु असल्याचं बिचुकले यांनी या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

…आणि दगडी चाळीत अवतरले डॅडी

बिग बॉस १३ वर बंदी आणा, करणी सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा