राज्यात महायुतीचंच सरकार येणार, असं सांगतानाच भाजपचं शिष्टमंडळ गुरूवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याऐवजी केवळ राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शिवसेनेच्या होकाराशिवाय भाजप राज्यपालांना भेटत असल्याने सरकार स्थापनेविषयीची उत्सुकता कमालिची ताणली गेलीय.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुनगंटीवार म्हणाले की,
राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे लवकरच महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. यासंबंधीची गोड बातमी लवकरच मिळेल. त्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहे. त्यानंतरच महायुतीच्या फाॅर्म्युल्याची माहिती देण्यात येईल.
हेही वाचा- आमचे आमदार फोडूनच दाखवा, भाजपला खुलं चॅलेंज
शिवसेनेचा होकार मिळण्याआधीच भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश का नाही? या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सांगितलं की, आम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणूनच राज्यपालांना भेटणार आहोत.
याचसोबत ३१ डिसेंबरपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली. राजकीय अस्थिरतेच्या काळात प्रदेशाध्यक्ष बदलाची घाई करण्याची गरज काय? यावरूनही चर्चा सुरू झाल्या.
हेही वाचा-
सरकार महायुतीचंच येणार, भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा
सरकार स्थापनेवर शरद पवार यांचं मोठं विधान, शिवसेनेला धक्का?