Advertisement

आमचे आमदार फोडूनच दाखवा, भाजपला खुलं चॅलेंज

जो आमदार फुटून आपल्या पक्षाबाहेर पडेल, त्याला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येतील, असा सज्जड दमच या पक्षांनी आपल्या आमदारांना दिला आहे. त्यामुळे भाजपसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.

आमचे आमदार फोडूनच दाखवा, भाजपला खुलं चॅलेंज
SHARES

महाराष्ट्रात सरकार स्थापनेची सूत्र आता राज्याकडून दिल्लीत पोहोचलेली आहेत. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत नमतं घेण्याच्या तयारीत नसल्याने भाजपकडून कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. परंतु या इशाऱ्याला न घाबरता आमचे आमदार फोडूनच दाखवा, असं खुलं चॅलेंज विरोधकांकडून भाजपला देण्यात आलं आहे. 

सत्तास्थापनेच्या दृष्टीने शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस जवळ आल्यास या तिन्ही पक्षांतील आमदारांना फोडण्यासाठी भाजप पुन्हा एकदा कर्नाटक खेळी खेळू शकते, असं म्हटलं जात आहे. परंतु जो आमदार फुटून आपल्या पक्षाबाहेर पडेल, त्याला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येतील, असा सज्जड दमच या पक्षांनी आपल्या आमदारांना दिला आहे. त्यामुळे भाजपसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.

हेही वाचा- प्रस्तावाशिवाय शिवसेनेला पाठिंबा देणार कसा? शरद पवारांची गुगली

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास फारशा उत्सुक नसल्याचं म्हटलं जात आहे. सोनिया गांधी यांनी विचार करण्यास आणखी थोडा वेळ मागून घेतला असून त्या काय निर्णय घेतात, यावर महाराष्ट्रातील सत्तासमिकरणं अवलंबून आहेत.



हेही वाचा-

शिवसेनेने ठरवलं तरच पर्यायी सरकार देता येईल- नवाब मलिक

मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार- संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा