Advertisement

प्रस्तावाशिवाय शिवसेनेला पाठिंबा देणार कसा? शरद पवारांची गुगली

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. कारण शिवसेनेकडून तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

प्रस्तावाशिवाय शिवसेनेला पाठिंबा देणार कसा? शरद पवारांची गुगली
SHARES

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. कारण शिवसेनेकडून तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी ही माहिती दिली. 

सोनियांशी चर्चा

सोनिया गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर नेमकी काय चर्चा झाली? काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. सोनिया गांधींना महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित होते. 

विरोधात बसण्याचा कौल

जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळही नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भाजपाची आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरेंबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही. कारण त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.  

सोनिया गांधींबरोबर झालेल्या भेटीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही. पण भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही, असंही पवार म्हणाले.



हेही वाचा-

सरकार स्थापनेत शिवसेनेची अडचण नाही- संजय राऊत

सत्तासमिकरणावर मुख्यमंत्र्यांचं ‘नो कमेंट’, ‘युती’ वर बोलण्याचंही टाळलं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा