Advertisement

सत्तासमीकरणावर मुख्यमंत्र्यांचं ‘नो कमेंट’, ‘युती’ वर बोलण्याचंही टाळलं

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच शहा यांची भेट घेतली. फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी सुमारे अर्धातास चर्चा केली. या भेटीतील चर्चेला तपशील समजू शकला नाही.

सत्तासमीकरणावर मुख्यमंत्र्यांचं ‘नो कमेंट’, ‘युती’ वर बोलण्याचंही टाळलं
SHARES

सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी आणि भाजपचे नेते कुठलीही प्रतिक्रिया देणार नाहीत. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने राज्यात लवकरच सरकार बनेल, याबद्दल आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र असं बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ‘युती’चं सरकार हा शब्द घेण्याचं जाणीवपूर्वक टाळलं. 

शहांची भेट

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच शहा यांची भेट घेतली. फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी सुमारे अर्धातास चर्चा केली. या भेटीतील चर्चेला तपशील समजू शकला नसला, तरी शिवेसनेने केलेल्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सू्त्रांनी दिली. परंतु महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

चर्चा करणार

निवडणूक निकालानंतर राज्यातील परिस्थितीत लक्ष न घालता, राज्यातील सत्तास्थापनेबाबतची सर्व चर्चा राज्यातील नेते करतील भाजपने आधी जाहीर केलं होतं. परंतु केंद्रीय नेत्यांसोबतच चर्चा करण्यावर शिवसेना ठाम आहे. सत्तास्थापनेसंदर्भात तोडगा न निघाल्यास शहा शिवसेना नेतृत्वासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

भाजपची नमती भूमिका, शिवसेनेला गृह, महसूल खातं देणार?

'या' कारणासाठी संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा