Advertisement

भाजपची नमती भूमिका, शिवसेनेला गृह, महसूल खातं देणार?

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समसमान वाटा हवाच! यावर ठाम असलेल्या शिवसेना नेतृत्वापुढं भाजपनं काहीसं नमतं घेण्याचं ठरवलं आहे.

भाजपची नमती भूमिका, शिवसेनेला गृह, महसूल खातं देणार?
SHARES

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समसमान वाटा हवाच! यावर ठाम असलेल्या शिवसेना नेतृत्वापुढं भाजपनं काहीसं नमतं घेण्याचं ठरवलं आहे. यानुसार शिवसेनेच्या वाट्याला महसूल आणि अर्थ अशी महत्वाची खाती देऊन मुख्यमंत्रीपद मात्र स्वत:जवळच ठेवण्याची रणनिती भाजपनं आखल्याची खात्रीलायक माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटूनही सत्तास्थापनेची कोंडी कायम असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जात आहे.  

'ही' खाती देणार

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह नगरविकास, गृह, महसूल, अर्थ आणि विधानसभा अध्यक्षपद मिळावं, असा शिवसेना नेतृत्वाचा आग्रह आहे. सुरूवातीला कुठलीही महत्त्वाची खाती सोडण्यास नकार देणाऱ्या भाजपने आता शिवसेनेला महसूल आणि अर्थ या महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम खातं देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्रीपद कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, यावर भाजपा ठाम आहे.

अमित शहा चर्चा करणार

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेशी चर्चा करण्याचा अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. परंतु, शिवसेनेला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच चर्चा करायची आहे. या जागावाटपावर शिवसेनेचं समाधान न झाल्यास गृहमंत्री अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, असं भाजपकडून सांगितलं जात आहे.



हेही वाचा-

शपथविधीसाठी भाजपाने बुक केले वानखेडे स्टेडियम

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा