Advertisement

शपथविधीसाठी भाजपाने बुक केले वानखेडे स्टेडियम

शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता स्थापनेबाबत अद्याप कसलीच चर्चा झाली नसताना भाजपा मात्र उतावीळ झाल्याचं दिसून येत आहे.

शपथविधीसाठी भाजपाने बुक केले वानखेडे स्टेडियम
SHARES

शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता स्थापनेबाबत अद्याप कसलीच चर्चा झाली नसताना भाजपा मात्र उतावीळ झाल्याचं दिसून येत आहे. भाजपाने नवीन सरकारच्या शपशविधी सोहळ्यासाठी वानेखेडे स्टेडियम ५ नोव्हेंबरसाठी बुक केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

याआधी शपथविधी सोहळ्यासाठी महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान निवडण्यात आलं होतं. मात्र, मुंबई पोलिसांच्या अहवालानंतर रेसकोर्स रद्द करून वानखेडे स्टेडियम निश्चीत करण्यात आलं. ५०-५० फॉर्म्युल्यावरून भाजपा - शिवसेनेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप सत्ता वाटपाबाबत एकदाही चर्चा झाली नाही. शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला सकारात्मक प्रतिसादही दिलेला नाही.

दुसरीकडे भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही तर शिवसेनेला पाठिंबा देऊ असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचं एक शिष्टमंडळ दिल्लीत गेलं असून याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर शिवसेनेशी चर्चा करण्याआधीच भाजपाने शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम बुक केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हेही वाचा -

शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये - संजय निरुपम

भाजपाकडून शिवसेनेची फसवणूक - अशोक चव्हाण
संबंधित विषय
Advertisement