Advertisement

शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये - संजय निरुपम

भाजपा व शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये असं संजय निरूपम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये - संजय निरुपम
SHARES

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरूपम यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला आहे. भाजपा व शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये असं संजय निरूपम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

निरूपम म्हणाले की, शिवसेनेचा सध्या दिखावा, तमाशा व नाटक सुरू आहे. शिवसेना कधीच भाजपाच्या सावलीतून बाहेर पडणार नाही, हे मी माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगतो. शिवसेना वर्षानुवर्षे भाजपाशी भांडत आलेली आहे व अखेर जास्त हिस्सा पदरात पाडून घेत ती सत्तेतच बसते. आमच्या नेत्यांकडून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचं बोललं जात आहे हे काँग्रेसच्या विचारधारेला नुकसान पोहचवणारे आहे. काँग्रेस पक्ष अगोदरच अत्यंत वाईट काळातून जात आहे. आता शिवसेनेशी जवळीक केली तर काँग्रेससाठी हे नुकसानदायक ठरेल. त्यामुळे काँग्रेसने या भानगडीत पडू नये. 

भाजपाला सरकार स्थापनेत अपयश आलं तर संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी असेल. शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास पुढाकार घेतला आणि पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्यावर आम्ही नक्कीच विचार करू, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. 



हेही वाचा -

भाजपाकडून शिवसेनेची फसवणूक - अशोक चव्हाण

...अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू होईल, भाजपचा शिवसेनेला इशारा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा