Advertisement

मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार- संजय राऊत


मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार- संजय राऊत
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा 'मुख्यमंत्री' कोणाचा? या प्रश्नावरून सध्या शिवसेना-भाजप युतीतील वाद दिवसेंदिवस आणखीनच चिघळत चालला आहे. दोन्ही पक्षामध्ये वाद सुरू असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असं वक्तव्य केलं आहे. मंगळवारी सकाळी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं सूचक वक्तव्य केले.

सत्तास्थापनेवरून भाष्य

मागील काही दिवस सकाळच्या सुमारास संजय राऊत हे पत्रकार परिषद घेत आहेत. सत्तास्थापनेवरून या पत्रकार परिषदेत ते भाष्य करत आहेत. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

ही सत्याची लढाई

मंगळवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी 'मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार. ही सत्याची लढाई असून, विजय आमचाच होईल. राज्याचा निर्णय राज्यातच होणार', असे म्हटलं. तसंच, 'राज्याचा चेहरा आता बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार', अशा शब्दात राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शपथग्रहण सोहळा

लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.



हेही वाचा -

शिवसेनेचं संख्याबळ ६४ वर, 'या' आमदारानं दिला पाठिंबा

पीएमसी बँक प्रकरणात आठव्या खातेदाराचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा