शिवसेनेचं संख्याबळ ६४ वर, 'या' आमदारानं दिला पाठिंबा


शिवसेनेचं संख्याबळ ६४ वर, 'या' आमदारानं दिला पाठिंबा
SHARES

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस झाले तरी राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री कोणाचा? या प्रश्नावरून सध्या दोन्ही पक्षामध्ये वाद सुरू आहे. मात्र, युतीत एकीकडं वाद सुरू असला तरी भाजप-शिवसेना युतीमध्येच संख्याबळाची शर्यत गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. शिवसेनेत आता आणखी एका अपक्ष आमदाराची भर पडली असून सेनेचे संख्याबळ ६४ इतकं झालं आहे.

मातोश्रीवर भेट

कोल्हापूरच्या शिरोळ मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे उपस्थित होते.

युवकांना रोजगार

यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचं यावेळी राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी म्हटलं. त्याशिवाय, राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानंच शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.हेही वाचा -

प्रस्तावाशिवाय शिवसेनेला पाठिंबा देणार कसा? शरद पवारांची गुगली

क्रिती सेननचा 'पानिपत'मधील फर्स्ट लूक पाहिला का?संबंधित विषय