Advertisement

क्रिती सेननचा 'पानिपत'मधील फर्स्ट लूक पाहिला का?

अर्जुन, संजय आणि क्रिती यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचीही महत्त्वाची भूमिका यात आहे. पण अद्याप तिचा लूक रिव्हिल करण्यात आलेला नाही.

क्रिती सेननचा 'पानिपत'मधील फर्स्ट लूक पाहिला का?
SHARES

ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आता पानिपतच्या लढाईवर चित्रपट घेऊन येत आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी त्यांनी दिग्दर्शित केलेला 'पानिपत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक समोर आले आहेत. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात संजय दत्त हा अभिनेता अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अर्जुन कपूर सदाशिव राव आणि अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईच्या भूमिकेत झळकणार आहे. या तिघांच्याही लूकचे फोटो आशुतोष गोवारीकर यांनी ट्विट केले आहेत. अर्जुन, संजय आणि क्रिती यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचीही महत्त्वाची भूमिका यात आहे. पण अद्याप तिचा लूक रिव्हिल करण्यात आलेला नाही. नानासाहेब पेशवा यांच्या पत्नी असलेल्या गोपिका बाई यांची भूमिका पद्मिनी कोल्हापूरे साकारणार आहे.

 

पानिपतची लढाई मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दाली यानं ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीहीसदाशिवरावभाऊ या युद्धात कामी आला. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत.
हेही वाचा

'पती, पत्नी और वो' चित्रपटाचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित
संबंधित विषय
Advertisement