Advertisement

'पत्नी' आणि 'ती'च्यात अडकलेला कार्तिक आर्यन

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार होती.

'पत्नी' आणि 'ती'च्यात अडकलेला कार्तिक आर्यन
SHARES

आतापर्यंत बॉलीवूडला बायोपिकचं याड लागलं होतं. आता चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेंड सुरू आहे. याच धाटणीतील पती, पत्नी और वो नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर ही तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहेत.

पती, पत्नी और वो हा एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच कार्तिक आर्यन म्हणजेच चिंटू त्यागीची ओळख होते. आज्ञाकारी मुलगा असल्यानं तो वडिलांच्या सांगण्यावरून शिक्षण घेतो, नोकरी करतो आणि नंतर भूमी पेडणेकरशी लग्न देखील करतो. पण ऑफिसमध्ये त्याची ओळख अनन्या पांडेसोबत होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. मात्र एकाच वेळी बायको आणि प्रेयसीला सांभाळताना चिंटूची कळी तारांबळ उडते हे ट्रेलरमधून पाहायला मिळतं. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.


१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारीत असून त्याला विनोदाची किनार होती. या कारणास्तव हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे या हेतूनं मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट टाकण्यात आला.हेही वाचा

हस्तर पुन्हा येतोय

सनी लिओनीवर चोरीचा आरोप

संबंधित विषय
Advertisement