Advertisement

सनी लिओनीवर चोरीचा आरोप

डाएट सब्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सनीवर हा आरोप करण्यात आला आहे. यावरून सध्या सनी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. यावर अखेर सनीनं प्रतिक्रिया दिली आहे.

सनी लिओनीवर चोरीचा आरोप
SHARES

अभिनेत्री सनी लिओनीला इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक चित्र शेअर करणं भारी पडलं आहे. या चित्रामुळे सनीवर चोरीचा आरोप लागला आहे. डाएट सब्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सनीवर हा आरोप करण्यात आला आहे. यावरून सध्या सनी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे

सनीवर गंभीर आरोप

सनी लिओनीनं अलिकडेच एक चित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं होतं. हे चित्र तिनं स्वत: काढल्याचा दावा केला होता. तसंच या चित्राला विकल्यानंतर मिळणारे पैसे ती कर्करोग ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी देणार होती. मात्र हे चित्र मलिका फावरे नावाच्या चित्रकाराचं असून तिनं या चित्राची नक्कल केल्याचा आरोप डाएट सब्या या इंस्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आला आहे.


सोशल मीडियावर ट्रोल

डाएट सब्यानं इंस्टाग्रावर एक पोस्ट लिहून सनीवर टीका केली आहे. “एखाद्या कलाकाराची मेहनत त्याची परवानगी न घेता चोरणं हे दुष्कृत्य आहे.” अशी पोस्ट डाएट सब्यानं शेअर केली आहे. या पोस्टमुळे सनीला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे.काय म्हणाली सनी?

मात्र या प्रकरणावर सनीनं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही. मला ते चित्र खुप आवडलं त्यामुळे ते पुन्हा एकदा मी रेखाटलं. या चित्राच्या लिलावातून येणारे पैसे कॅन्सरग्रस्तांना देण्यात येणार आहेत. कोणालाही माझं चित्र आवडलं नसेल तर मला माफ करावं” अशी प्रतिक्रीया सनीनं दिली आहेहेही वाचा

हस्तर पुन्हा येतोय

असा आहे ‘गुलाबो सिताबो' चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक


संबंधित विषय
Advertisement