Advertisement

असा आहे ‘गुलाबो सिताबो' चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक

तरण आदर्श यांनी आयुषमान खुरानाचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे.

असा आहे ‘गुलाबो सिताबो' चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक
SHARES

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता आयुषमान खुराना एकाच चित्रपटात झळकणार आहेत. ‘गुलाबो सिताबो’ असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराणाचा लूक समोर आला आहे. तरण आदर्श यांनी आयुषमान खुरानाचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे

'चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक पाहा’ असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. आयुषमान मध्यम वर्गीय कुटुंबामधील साधाभोळा मुलगा असल्याचं फोटोत पाहून वाटत आहे. त्याच्यासोबत बिग बी देखील उभे आहेत. या दोघांचे लूक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

गुलाबो सिताबो' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. चित्रपट २४ एप्रिल ऐवजी २८ फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार दिग्दर्शिन करणार आहेत.


हेही वाचा

खुशखबर! ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या नव्या सिरीजची घोषणा

'काटा लगा गर्ल'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री

संबंधित विषय
Advertisement