Advertisement

खुशखबर! ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या नव्या सिरीजची घोषणा

लवकरच एचबीओ नेटवर्क 'गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) या बहुचर्चित सिरीजचा प्रीक्वेल घेऊन येत आहे.

खुशखबर! ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या नव्या सिरीजची घोषणा
SHARES

टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय शो ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेम ऑफ थ्रोन्सचा प्रीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही महिन्यांपूर्वीच या सिरीजचा शेवटचा सीझन प्रसिद्ध झाला होता. लवकरच एचबीओ नेटवर्क 'गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) या बहुचर्चित सिरीजचा प्रीक्वेल घेऊन येत आहे.

हाऊस ऑफ ड्रॅगन

गेम ऑफ थ्रोन्स’ ही जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर’ या कादंबरीवर आधारित असलेली सिरीज आहे. याचा पहिला सीझन २०११ साली प्रदर्शित झाला होता. या सीझनला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून दर वर्षी एक असे ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे सलग आठ सीझन प्रदर्शित झाले. मालिकेचा आठवा सीझन काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आवडत्या सिरीजनं निरोप घेतल्यानं चाहत्यांमध्ये उदासी होती. त्यामुळे चाहत्यांच्या आग्रहाखातर निर्मात्यांनी ही सिरीज पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चाहत्यांना ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ची कहाणी पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा लोगो एचबीओनं प्रसिद्ध केला आहे.

'इतके' एपिसोड असणार

गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रीक्वेलचं नाव ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ (House of the Dragon) असं असणार आहे. या सीझनमध्ये १० एपिसोड असतील. यात गेम ऑफ थ्रोन्समध्ये दाखवण्यात आलेल्या घटनांच्या ३०० वर्षे आधी सेट करण्यात आला आहे. त्यामुळे यात जॉन स्नो, आर्या स्टार्क, मदर ऑफ ड्रायगन, सँसा स्टार्य अशा कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिरेखा दिसणार नाहीत. या व्यक्तिरेखा निर्माण होण्यापूर्वी वेस्टरॉस साम्राज्यात कुठल्या घडामोडी घडल्या होत्या ज्यामुळे ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे युद्ध झालं, याबाबत या प्रीक्वेलमधून माहिती दिली जाणार आहे

गेम ऑफ थ्रोन्सचा शेवटचा सीझन संपल्यावर एचबीओनं घोषणा करत नाओमी वॅट्स सोबत प्रीक्वल करण्यार असल्याची घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी एचबीओनं 'हाऊस ऑफ ड्रॅगन' बनवण्याचा निर्णय घेतला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा