'काटा लगा गर्ल'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री

२९ ऑक्टोबरलाच तिनं बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. येत्या काही दिवसात हा भाग टीव्हीवर प्रदर्शित केला जाईल.

SHARE

'काटा लगा' या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आलेली शेफाली जरीवाला लवकरच बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक म्हणून बिग बॉस हा शो ओळखला जातो. आता या शो चे १३ वे पर्व सुरु असून यात शेफालीची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे

२९ ऑक्टोबरलाच तिनं बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. येत्या काही दिवसात हा भाग टीव्हीवर प्रदर्शित केला जाईल. शेफालीनं सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात आयटम साँग केलं आहे. ‘बुगी वुगी’, ‘नच बलिये ५’ आणि ‘नच बलिये ७’ या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

मीत ब्रदर्स’ या प्रसिद्ध गायक जोडीतील हरमीत गुलजार याच्याशी तिनं लग्न केलं होतं. मात्र, काही काळातच हे लग्न मोडलं. कारण हरमीत तिला मारहाण करायचा अशी तक्रार तिनं पोलिसांकडे केली होती. त्यानंतर अभिनेता पराग त्यागीला ती डेट करत होती. पराग आणि शेफाली ‘नच बलिये’च्या एका पर्वातही झळकले होते. जवळपास चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केल्याची चर्चा होती.


खुशखबर! ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या नव्या सिझनची घोषणा

'डेली बेली २' चित्रपटात काम करण्यास वीर दास उत्सुक


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ